सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या कामगारांना मोफत कोविशिल्ड लस.

टिम विजयदिप न्यूज.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वसंतदादा मेडीकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर व कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत कारखान्याचया कामगारांना कोविशिल्डचा पहिला डोस मोफत देण्यात आला. वसंतदादा मेडीकल फौंडेशनचे संस्थापक डॉ.सुधीर शिनगारे, कारखान्याचे मेडीकल ऑफिसर जयश्री शिनगारे व जनकल्याण हॉस्पिटलचा सर्व स्टाफ उपस्थित होते.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सध्या सोलापूर जिल्ह्यात तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव, अपुरा लसीचा पुरवठा, शासकीय रुग्णालयात आणी खाजगी रुग्णालयात लस घेण्यासाठी होणारी अफाट गर्दी यांचा विचार करुन कारखान्याचे कामगार व त्यांचे कुटुंबियांचे संरक्षण व्हावे या साठी कामगारांना कारखाना कार्यस्थळावरच पहिली मोफत लस देण्याचे नियोजन करुन आज सुरुवातीस कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांचेसह पहिल्या टप्यात १२५ कामगारांना मोफत लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्यात लस उपलब्ध होताच टाईम विभागाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना लस देण्यात येणार असून कारखान्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगीतले.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.