इतर

३१ जानेवारी अखेर प्रतिटन २१०० प्रमाणे ऊस बिल अदा- आ.बबनराव शिंदे

कारखान्याकडे नोंदलेल्या ऊसाचे मार्च अखेर गाळप होणार.

टिम: विजयदिप न्यूज.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब येथील सन २०२१-२२ गळीत हंगामामध्ये ३१ जानेवारी, २०२२ अखेर गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन २ हजार १०० प्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे  यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.१ व २ चे ऊस गाळप जोमाने सुरू असून आजअखेर युनिट नं.१ कडे १४ लाख १२ हजार ००२ मे.टन तर युनिट नं.२ कडे ४ लाख ३२ हजार ५९४ मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामासाठी युनिट नं.१ कडे २० लाख व युनिट नं.२ कडे ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे ३१ जानेवारी अखेर गाळपास आलेल्या सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रति मे.टन रू.२ हजार १०० प्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे. तसेच दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहूतक करणा-या कंत्राटदारांचे १५ जानेवारी अखेर संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बीले अदा करण्यात आलेली आहेत. या हंगामअखेर पर्यंत गळीतास येणा-या ऊसाची व तोडणी वाहतूक बीले वेळेत ऊस पुरवठादार शेतकरी व कंत्राटदारांना अदा करण्यात येतील अशी माहीती त्यांनी दिली.

सन २०२१-२२ गळीत हंगामासाठी युनिट नं.१ व २ कडे सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप मार्च २०२२ अखेर पर्यंत होणार असून सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांनी ऊस तोडणीकरीता तोडणी यंत्रणेच्या कोणत्याही अमिषास बळी पडु नये. तसेच सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचा ऊसाचे  वेळेमध्ये गाळप होईल. तरी सर्व सभासद, ऊस पुरवठादार यांनी संपुर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक-चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!