क्रिकेट बरोबरच युवकांनी पारंपारीक खेळ जपले पाहिजेत.- हंसराज माने-पाटील.

अकलूज विजयदिप न्यूज.
क्रिकेट बरोबरच युवकांनी पारंपारीक खेळ जपले पाहिजेत असे प्रतिपादन बागेचीवाडी (ता.माळशिरस) चे माझी सरपंच हंसराज फत्तेसिंह माने-पाटील यांनी केले. ते बागेचीवाडी-नऊचारी येथे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुजयसिंह माने-पाटील, विनोद दोशी, बाळासाहेब शिंदे, कृष्णराज माने-पाटील, अभिनेते गोल्डन मॅन संदीप गांधी, गिरिराज माने-पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धा साठी बक्षीस प्रथम पारितोषीक १५ हजार रुपये हंसराज माने-पाटील, व्दितीय १० हजार रुपये सुजयसिंह माने-पाटील, तृतीय ७ हजार रुपये गिरीराज डेव्हलपर्स अकलुज व वैयक्तिक बक्षीसे उत्कृष्ठ फलंदाज ५०० रुपये, उत्कृष्ठ फलंदाज ५०० रुपये, गोलदांज, क्षेञरक्षक, सलग ६ षटकार, सलग ६ चौकार, सलग ४ विकेट यांना प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस गिरिराज माने-पाटील यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. या स्पर्धासाठी ९० संघानी नांव नोंदणी केली असल्यामुळे या स्पर्धा रंगतदार होणार असल्याचे रणजितसिंह गायकवाड व विक्रम शिंदे यांनी सांगितले.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टंसींगचे नियम पालन करुन सॅनिटायझर व मास्कचा वापर करुनच स्पर्धा स्थळावर प्रवेश दिला आहे.
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य रणजितदादा गायकवाड, विक्रम शिंदे, राहुल टिळेकर, नितिन कांबळे, प्रशांत कुलकर्णी, हर्षवर्धन कांबळे, निखिल पवार, रवि भोके, रणजित भोके, सचिन धुमाळ, जोतिराव कणसे, अस्लम शेख यांसह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.