माळशिरस तालुका

कोरोनो काळात पोलिस पाटलांचे योगदान मोलाचे- अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे.

विजयदिप न्यूज.

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात सर्व पोलीस पाटीलांनी मोलाचे सहकार्य करुन उत्कृष्ट कामगिरी बजावली. असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी व्यक्त केले. ते वेळापुर (ता. माळशिरस) येथील वेळापुर पोलिस ठाण्याच्या बीट मधील पोलिस पाटील यांनी कोरोनोच्या परिस्थीत शासनाला मोलाचे सहकार्य केल्याबद्बल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी बोलत होते.

यावेळी वेळापुर पोलिस स्टेशनचे सपोनि दिपक जाधव उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात वेळापुर पोलिसस्टेशन बीटमधील तोंडले पोलीस पाटील शशिकांत मोरे, दसुर पोलीस पाटील महेश शिंदे, बोंडले पोलीस पाटील पोपट वाघमारे, कोळेगांव पोलीस पाटील बिभीषण दुपडे, मळोली पोलीस पाटील संतोष पवार, खंडाळी पोलीस पाटील सुभाष कटके, तांदुळवाडी पोलीस पाटील पृथ्वीराज पाटील, फळवणी पोलीस पाटील माया आवताडे, साळमुख पोलीस पाटील प्रशांत मदने, पिसेवाडी पोलीस पाटील सुमंत गायकवाड, निमगाव पोलीस पाटील सारिका मगर, धानोरे देवकते पाटील, खळवे पोलीस पाटील विकास नाईकनवरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!