माळशिरस तालुका

जिल्हा परिषद प्राथमिक, शाळा मुंडफणेवाडी यांच्यातर्फे गड-किल्ले स्पर्धेचे आयोजन

विजयदिप न्यूज.

दिवाळी ही फक्त आकाशकंदील, फराळ, रोषणाई आणि फटाक्यांपुरती मर्यादित नसून  दिवाळीतले गड-किल्ले आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी झेडपी शाळा मुंडणेवाडी यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पहिली ते चौथी मधील तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

महाळुंग केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडफणेवाडी दरवर्षी दिवाळी मध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनवणे, पणत्या तयार करणे असे विविध उपक्रम राबवत असतात ह्या वर्षी गड किल्ल्याचे स्पर्धा आयोजन करून संदेश देत किल्ले करणे ही एक कला आहे. नव्या पिढीपर्यंत ही कला, परंपरा पोहचावी यासाठी शाळेतील  शिक्षकांनी  ‘किल्ले स्पर्धा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. याचबरोबरीने स्पर्धेमध्ये रायगड, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, परांडा अशा विविध गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केली होती या स्पर्धेचे उद्घाटन महाळुंग केंद्रप्रमुख हर्षवर्धन नाचणे, डॉ.पुष्कर नाचणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी च्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग  नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांक सिद्धनाथ शिंदे (इयत्ता चौथी), द्वितीय क्रमांक राजनंदनी मिसाळ (इयत्ता दुसरी), तृतीय क्रमांक शुभम कांबळे (इयत्ता तिसरी), उत्तेजनार्थ श्रावणी निकम (इयत्ता पहिली), आयुष वाघ (इयत्ता चौथी) विजयी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व  प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक समीर लोणकर, अर्चना वाघ उपस्थित होते तसेच माळशिरस गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!