इतर

वेळापूर पोलीसांकडून अवैध धंद्यावर कारवाई.

टीम विजयदिप न्यूज.

वेळापूर (ता.माळशिरस) पोलीसांनी तीन ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई केली असून साधारणपणे ४७ हजार ७५० रुपये किमतीची हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली असल्याची माहीती वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.६ मे रोजी ६.३० वा. सुमारास यातील आरोपी बापू धोंडीबा काळे (वय ५५) रा.चव्हाणवाडी, वेळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर हा मौजे चव्हाणवाडी वेळापूर येथील पारधी वस्ती मधील त्याचे राहते घराचे पाठीमागील बाजूस हातभट्टी दारू तयार करण्याची भट्टी लावून भट्टीतून हातभट्टी दारू काढून वरील प्रमाणे आंबट उग्र घाणं वासाची हातभट्टी दारू विक्री करीत असताना मिळून आला आहे.

तसेच दुसर्‍या कारावाईबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.६ मे रोजी ७.४० वा. सुमारास यातील आरोपी संतोष भिमराव काळे रा.चव्हाणवाडी, वेळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर हा मौजे चव्हाणवाडी वेळापूर येथील पारधी वस्ती मधील त्याचे राहते घराचे पाठीमागील विहिरीजवळ हातभट्टी दारू तयार करण्याची भट्टी लावून भट्टीतून हातभट्टी दारू काढून वरील प्रमाणे आंबट उग्र घाणं वासाची हातभट्टी दारू विक्री करीत असताना दिसून आला व पोलिसांना पाहताच पळून गेला आहे.

तसेच तिसर्‍या कारवाई बाबत सविस्तर वृत्त असे की, दि.६ मे रोजी ९ वा. सुमारास यातील आरोपी नामदेव शिवाजी काळे रा.चव्हाणवाडी, वेळापूर ता.माळशिरस, जि.सोलापूर हा मौजे चव्हाणवाडी वेळापूर येथील पारधी वस्ती मधील त्याचे राहते घराचे पाठीमागील विहिरी जवळील छपरा मध्ये हातभट्टी दारू तयार करण्याची भट्टी लावून भट्टीतून हातभट्टी दारू काढून वरील प्रमाणे आंबट उग्र घाणं वासाची हातभट्टी दारू विक्री करीत असताना दिसून आला व पोलिसांना पाहताच पळून गेला आहे.

पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून हातभट्टी दारूची भट्टी उध्वस्त करून रसायन व दारू सॅम्पल करिता काढून घेऊन रसायन व हातभट्टी दारू चे साहित्य घेऊन येण्यास अवजड असल्याने जागीच दारूची भट्टी फोडून व रसायन सांडून नष्ट केले आहे.

सदर तीनही प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५(ई), ६५(फ) प्रमाणे वेगवेगळ्या तीन गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका मेहेरकर करत आहेत.

सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोकॉं.नवनाथ थिटे, पोकॉं.विठ्ठल बंदुके, पोकॉं.तांबोळी दोन होमगार्ड यांच्या पथकाने पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!