चंदन चोरास केली; अकलूज पोलीसांनी अटक.

सुमारे २० हजार किमतीचे चंदनाचे ओले ओंडके घेतले ताब्यात.
टीम: विजयदिप न्यूज.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा लावून दोन चंदन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून २० किलो वजनाचे सुमारे २० हजार रुपये किंमतीचे चंदनाचे ओले ओंडके ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत असणार्या श्रीपूर औट पोस्ट हद्दीत शनिवार २३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम जांबुड (ता.माळशिरस) या गावाकडून बोरगांव कडे मोटार सायकल वर निघाले असुन त्या दोघांच्या मध्ये पांढरे रंगाचे पोत्यात कांही तरी संशयास्पद असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा लावून सतिश फकिरा साठे व सतिश अजिनाथ साठे दोघे (रा.बोरगाव ता.माळशिरस) यांना मोटार सायकलसह बोरगांव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ अडवून त्यांचे जवळील पोत्यामध्ये असणारे २० किलो वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे दोन मोठे चंदनाचे आले ओंडके मिळून आले.
त्यांच्या विरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर आरोपींना रविवार २४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रथम वर्ग न्यायालय, माळशिरस मध्ये हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. त्यांचे कडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे, ए.एस.आय पानसरे, पोहेकाँ किशोर गायकवाड, पोना संजय चंदनशिवे, पोना अमित यादव यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ किशोर गायकवाड हे करीत आहेत.