पालखी मार्गाच्या विविध समस्यांसाठी प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख यांची अमरसिंह माने-देशमुख व सतिश माने-देशमुख यांनी घेतली भेट.

टीम विजयदिप न्यूज.
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्गावरील वेळापूर, उघडेवाडी,पिसेवाडी हद्दीतील समस्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने-देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य सतिशराव माने-देशमुख यांनी अकलूजचे प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख यांची भेट घेवून दिले.

यावेळी प्रांताधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत आळंदी-पंढरपूर श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे अतिशय जलदगतीने काम होत असल्याबाबत कौतुक केल. मात्र या राष्ट्रीय महामार्गावरील वेळापूर, उघडेवाडी, पिसेवाडी हद्दीतील कांही शेतक-यांची शेतजमीनी भुसंपादन केले आहे. त्यांना शासकीय नियमानुसार आर्थिक मोबदला दिला आहे.परंतु कांही शेतक-यांच्या शेतजमीनीचे भुसंपादन केले असले तरी आर्थिक मोबदला मिळाला नसून तो लवकरात-लवकर द्यावा. त्याचबरोबर बर्याच शेतक-यांना नोटीस आल्या नाहीत अथवा मिळल्या नाहीत त्याठिकाणाचे काम तात्पुरते थांबवून अडचणी जाणून घ्याव्यात. त्यामुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी वेळापूर मंडल अधिकारी रणसुंभे तसेच वेळापूर, पिसेवाडी, उघडेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.