इतर

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा.

टिम: विजयदिप न्यूज.

श्रीपूर(ता.माळशिरस) येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेना, माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रीपूर परिसरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

      यावेळी  श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव जाधव, श्रीपुर पत्रकार संघाचे सचिव पत्रकार प्रकाश केसकर, पत्रकार सुखदेव साठे, हिम्मत नागणे, शिवराम गायकवाड, बबलू कदम, बिभीषण पाटील, गणेश साळुंखे यांच्या शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            या कार्यक्रमात श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव जाधव (दै.सुराज्य), संघाचे सचिव प्रकाश केसकर(दै.तरूण भारत), पत्रकार सुखदेव साठे(दै. पुढारी), पत्रकार दत्ता नाईकनवरे (दै.संचार), पत्रकार विनायक बागडे (दै.तरूण भारत संवाद), पत्रकार दादा माने (दै.एकमत), पत्रकार राजु टिंगरे (साप्ताहिक पांडुरंग प्रसाद), पत्रकार अरविंद साठे (दै. शिवनिर्णय), पत्रकार गणेश जोगळेकर (दै.जनसत्य), पत्रकार हुसेन मुलाणी (दै.बंधुप्रेम) या पत्रकारांना बबलू कदम, सयाजीराव गायकवाड, दत्तात्रय दोरगे, सागर यादव, राजाभाऊ मोळे, डॉ.नागन्नाथ दगडे, गणेश साळुंखे, राहूल जगताप, चैतन्य जोशी, दिपक घळके आदी मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

            यावेळी सुमीत नागणे, सुरज गुळुमकर, ऋषीकेश कुलकर्णी, रवी पिसे, श्रीनिवास गायकवाड, विशाल साठे, स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम गायकवाड यांनी केले व उपस्थितांचे आभार पत्रकार विनायक बागडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!