विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा अंतिम हप्ता जाहीर. – आ.बबनराव शिंदे

बेंबळे/प्रतिनिधी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब येथे गाळप केलेल्या ऊसासाठी प्र.मे.टन रू.२५४/- प्रमाणे अंतिम हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर येथे २४ लाख ७८ हजार ९२२ मे.टन ऊसाचे गाळप केलेली आहे. तसेच युनिट नं.२ करकंब येथे ६ लाख ५५ हजार ५६४ मे.टन ऊसाचे गाळप केलेली आहे. दोन्ही युनिटचे मिळून ३१ लाख ३४ हजार मे.टनाचे देशामध्ये विक्रमी गाळप केलेले आहे.
ऊस गाळप हंगाम २०२१-२२ साठी युनिट नं. १ व २ कडे गाळप झालेल्या ऊसास यापुर्वी प्र.मे.टन रू.२ हजार १०० प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता, दुसरा हप्ता रु.२५०/-रु. प्रमाणे असे एकुण २ हजार ३५० रु. प्रति टन अदा करण्यात आलेला आहे. तर दिवाळी सणासाठी अंतिम हप्ता २५४/-रु. प्रति मे टन प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आला असून एकुण प्रति मे टन २ हजार ६०४ रुपये प्रमाणे रक्कम ऊस पुरवठादारांना होत आहे. युनिट नं.१ व २ कडे गाळप झालेल्या ऊसाचे अंतिम हप्त्या पोटी कारखान्याने ७९ कोटी ६१ लाख ५९ हजार रूपये बँकेत वर्ग केलेले आहेत.
गाळप हंगाम २०२२-२३ हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे गाळप क्षमते एवढा ऊसाचा पुरवठा होण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करार करणेची कार्यवाही सुरू आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना पहिला व दुसरा ॲडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला असून अंतिम हप्ता लवकरच अदा करणार आहे अशी माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.