आ.बबनदादा शिंदे यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक पदी बिनविरोध निवड.

टिम: विजयदिप न्यूज.
मांजरी (बु) ता.हवेली, जि.पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक पदावर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशा आशयाचे पत्राव्दारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी कळवले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था ऊस पिकाबाबत संशोधन प्रबोधन व मार्गदर्शन करून निरनिराळे प्रयोग करणारी महाराष्ट्रातील अग्रणी संस्था आहे. या संस्थेवर मागील पाच वर्ष आ.बबनदादा शिंदे हे संचालक म्हणून कार्यरत होते. आता पुन्हा त्यांची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आलेली असून ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे अधिपत्याखाली मार्गदर्शनानुसार काम करत असते. या संस्थेमध्ये ऊस पिकावर सातत्याने संशोधन केले जाते.
संचालक पदाच्या निवडीनंतर समाधान व्यक्त करून आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, उसाच्या जादा साखरयुक्त व कमी वेळेत पक्व होणाऱ्या ऊस संशोधनाची तळागाळातील शेतकऱ्यांना माहिती व्हावी, कमी खर्चात जास्तीत-जास्त उत्पादन कसे घेता येईल याचं ज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जावे व शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणेच यापुढेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत व्हावी असा अभिप्राय निवडीनंतर आ.बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल आ.बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आदी मान्यवरांसह महासंचालक शिवाजीराव देशमुख व इतर सर्व संबंधितांना धन्यवाद दिले आहेत.