महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

पंढरपूर तालुक्‍यातील रोहिणी गायगोपाळ ची एमपीएससी परीक्षेत बाजी.

नायब तहसीलदार पदाच्या परीक्षेत मिळवले यश.

टीम विजयदिप न्यूज

आंबे (ता.पंढरपूर) येथील रोहिणी अर्जुन गायगोपाळ या युवतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली असून नायब तहसीलदार पदाची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली आहे. आज एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला असून त्यामध्ये तिची या पदावर निवड झाली आहे.

मूळ आंबे येथील असलेल्या रोहिणी चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आंबे येथेच झाले आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून जिद्द, कष्ट व अभ्यासाच्या बळावर त्यांनी ही बाजी मारली आहे.  आंबे येथील जिजामाता प्रशालेची आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिने नावलौकिक मिळवला होता. २०१७ साली प्रशासनाधिकारी पदाची परीक्षा पास झाल्यानंतर तिने नायब तहसीलदार पदाचे ध्येय बाळगून शासकीय सेवा करीत हे यश मिळवले आहे.

रोहिणी गायगोपाळ सध्या मंगळवेढा नगरपालिकेत प्रशासनाधिकारी म्हणून सेवेत आहे. मात्र नायब तहसीलदार पदाची परीक्षा देऊन तीमध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून पुणे विभागाचे माजी शिक्षक आ.दत्तात्रय सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!