देश-विदेश

तिरंगी फुलांनी सजला श्री.विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यास प्रजासत्ताक दिना निमीत्त आकर्षक फुलांची आरास.

टीम विजयदिप न्यूज.

            पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभार्‍यात तिरंगी रंगाच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा अत्यंत आकर्षित दिसत आहे.

            भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या फुलांनी केलेल्या सजावटीनं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभार्‍याचे अनोखं रूप खुलून दिसत असून मंदिरातील गाभाऱ्यातील ही फुलांची सजावट फारच सुंदर असून फुलांच्या सजावटीचं काम पुण्यातील मोरया समूहाचे सचिन आण्णा चव्हाण, संदिप पोकळे व प्रकाश पोकळे यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी किमान खर्च ३० हजार रुपये एवढा आला आहे.

            या आरासीकरीता झेंडू, शेवंती, कामीनी या फुलांचे प्रकार वापरण्यात आलेले आहेत, यासाठी १५० किलो फुले वापरण्यात आलेली असून ही फुले ३ रंगाची आहेत.

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अप्रतिम व्हिडिओ. (सौजन्य- श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साई डेकोरेशनचे शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी सजावटीचे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!