महाराष्ट्रसोलापूर जिल्हा
सोलापूर ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक शिरीषकुमार एल. सरदेशपांडे; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली

टिम: विजयदिप न्यूज
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिरीषकुमार एल. सरदेशपांडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी राज्याच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले.
गृह विभागाने राज्यातील पोलिस अधिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून सातपुते यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांची बदली कोठे झाली याबाबतचा स्वतंत्र आदेश पुन्हा काढण्यात येईल असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.