माळशिरस तालुका

माळशिरस तालुक्यात मेगा कोविड लसीकरण मोहीम- डॉ.रामचंद्र मोहित.

माळशिरस तालुक्यासाठी ३० हजार डोसेस उपलब्ध.

टीम विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुक्यात उद्या मेगा लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून तालुक्यासाठी कोविशील्ड लसीचे ३० हजार डोस प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते यांनी दिली.

माळशिरस तालुक्यात शनिवार ११ सप्टेंबर रोजी एकूण ६४ लसीकरण केंद्रावरती लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन लसीकरणासाठी मदत करावी असे आवाहन डॉ.मोहिते यांनी केले आहे.

लस नियोजनाप्रमाणे संपवायची असल्याने व लसीकरण ऑनलाइन असल्यामुळे काही तांत्रिक अडचण असल्यास थोडा उशीर होऊ शकतो पण आपण त्यासाठी शांततेने मार्ग काढावा. सध्या कोविड रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आजचे हे लसीकरण पुढील काळासाठी संजीवनी असणार आहे. जेव्हा दुसरी लाट चालू होती तेव्हा लसीसाठी लोकांच्या रांगा लागत होत्या. आता लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. दुर्दैवाने परत कोविड रुग्णात वाढ झाली तेव्हा परत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता लस उपलब्ध असताना सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कोणत्या केंद्रावरती किती डोस याचा सविस्तर तक्ता खालील प्रमाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!