‘श्री.पांडुरंग सहकारी’मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

टिम: विजयदिप न्यूज.
श्रीपूर(ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील प्रांगणात कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून ७३ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे आणि कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, बाळासाहेब यलमार, भगवानराव चौगुले, भास्कर कसगावडे, तानाजी वाघमोडे, विजय जाधव, विठ्ठल सरवदे, सुदाम मोरे, शामराव साळुंखे तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्विकारून ती अस्तित्वात आली. यावेळी कारखान्याने राबविलेल्या उल्लेखनीय बाबीचाही प्रास्ताविकात उल्लेख करण्यात आला. मागील प्रजासत्ताक दिनी दिलेले सर्व शब्द कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी पाळले असून कामगारांना त्रिपक्षीय कराराप्रमाणे १२% पगार वाढीची रक्कम तसेच कारखाना स्तरावरील पगार वाढही करण्यात आली आहे.
अध्यक्षीय मनोगतात कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, आपला भारत देश गुलामगिरीतून सोडवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन देश स्वतंत्र झाला. कारखान्याच्या चालू हंगामात कारखान्याकडे सुमारे १५ लाखाच्या ऊस नोंदी असून या सर्व उसाचे कारखाना वेळेत गाळप करून पाठीमागील सर्व उच्चांक मोडीत काढून नवीन उच्चांक प्रस्थापित करणार आहे, त्यासाठी सर्व कामगार, अधिकारी आणि शेतकरी बंधूनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्श नुसार कारखान्यांच्या सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कामगारांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले, त्यामध्ये कामगार सेवक ट्रस्टच्या वतीने ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, साडी देऊन सन्मानित केले तसेच सेवानिवृत्त झालेल्या सर्व कामगारांचे यापुढील आयुष्य सुख समृद्धीचे, आनंदाचे व आरोग्य संपन्न जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधीर पोपळे व युनियन पदाधिकारी विजय पाटील यांनी केले.