‘पांडुरंग सहकारी’कडून पोळा सणासाठी ऊस बिल बँकेत वर्ग; स्व.सुधाकरपंत परिचारक यांची परंपरा आजही जतन.

विजयदिप न्यूज : प्रतिनिधी.
कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या सामाजिक जाणिवेचा वारसा पुढे नेत, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने पोळा सणानिमित्त गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रति मे.टन रु.७५/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. ही परंपरा आजही कारखाना व्यवस्थापन जतन करत असल्याची माहिती चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.

यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, सिताराम शिंदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी मान्यवर संचालक व अधिकारी उपस्थित होते.
चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक पुढे म्हणाले, कारखाना स्थापनेपासून स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने ऊस बिल देण्याची परंपरा सुरू केली होती. आजही ती परंपरा जपत, शेतकऱ्यांना सणासाठी लागणारी रक्कम मिळावी म्हणून हे ऊस बिल देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या ऊसासाठी आतापर्यंत प्रति मे.टन रु.२ हजार ७०० इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यासोबतच पोळा सणासाठी प्रति मे.टन रु.७५/- रक्कमही आता जमा करण्यात आली असून एकूण प्रति मे.टन रु.२ हजार ७७५/- इतके ऊस बिल मिळाले असून ऊस उत्पादकांना एफ.आर.पी. पेक्षाही ज्यादा रक्कम अदा केली आहे.
“आगामी गळीत हंगाम २०२५-२६ साठी कारखान्याकडे सुमारे १५ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद असून त्यातून १२ ते १४ लाख मे.टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. सर्व ऊसाचे वेळेत गाळप होईल, यासाठी ऑफ सिझनची सर्व कामे पूर्ण केली आहेत.
डॉ.यशवंत कुलकर्णी.
कार्यकारी संचालक.



