इतर

इकोल संघाचा दमदार विजय; २९५ धावांनी पुना क्लबचा पराभव.

श्रुती गीते, वैष्णवी म्हाळसकर यांची ३१५ धावांची विक्रमी भागीदारी; राठोडची भेदक गोलंदाजी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ महिला एकदिवशीय आमंत्रित स्पर्धेत इकोल संघाने पुना क्लब वर तब्बल २९५ धावांनी एकतर्फी विजय मिळवत दमदार कामगिरी केली.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इकोल संघाने ५० षटकांत ६ गडी गमावत ३५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला. संघाच्या विजयात श्रुती गिते हिने १६० धावांची अप्रतिम खेळी करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. तिला वैष्णवी म्हाळसकर हिने नाबाद ११८ धावांची साथ देत मोठी भागीदारी उभी केली. सुरुवातीला काही गडी लवकर बाद झाले तरी या दोघींनी डाव सावरत संघाला भक्कम स्थितीत नेले. दोघींनी सहाव्या विकेटसाठी तब्बल ३१५ धावांची विक्रमी भागीदारी रचत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले.

३५४ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना पुना क्लब चा संपूर्ण संघ २१.४ षटकांत केवळ ५८ धावांत गारद झाला. फलंदाजीत त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

इकोल च्या गोलंदाजीत श्री राठोड हिने ६ षटकांत ११ धावा देत तब्बल ५ बळी घेत शानदार गोलंदाजी केली. तिला वैष्णवी म्हाळसकर (२ बळी) आणि प्रेरणा देशमुख (१ बळी) यांनी उत्तम साथ दिली.

या विजयामुळे इकोल संघाने स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली असून पुढील सामन्यांसाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!