मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन.

विजयदीप न्यूज: प्रतिनिधी
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने कारखान्याच्या वतीने “जागर माय मराठीचा” या गीत-नृत्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. तसेच, मा.आ.प्रशांत परिचारक यांचा यथोचित सन्मान कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी मंडळींच्या हस्ते करण्यात आला.
कारखान्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांघिक तसेच वैयक्तिक खेळांचा समावेश होता. सांघिक खेळांमध्ये हॉलीबॉल, रस्सीखेच, क्रिकेट यांचा तर वैयक्तिक खेळांमध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ यांचा समावेश करण्यात आला.
याशिवाय मातोश्री वृद्धाश्रम व मूकबधिर शाळा यांना स्नेहभोजन व आर्थिक मदत करून वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्यात आला.
स्पर्धांचे उद्घाटन कारखान्याचे शासकीय लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांच्या हस्ते, चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे कार्यक्रम समाजाशी नाळ जपणारे आहेत. केवळ वैयक्तिक उत्सव न साजरा करता समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच खरी परंपरा कारखाना जपत आहे.
डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक



