पांडुरंग सहकारी’चे “पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कार जाहीर.

टीम विजयदिप न्यूज.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या संकल्पनेतून व कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना दरवर्षी कमीत-कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा व अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यास ”पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार” व ”पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” जाहीर करित असतो.

श्री.पांडुरंग सह. साखर कारखाना लि, श्रीपूर यांचे वतीने कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी “पांडुरंग ऊस भुषण” व “पांडुरंग आदर्श शेतकरी” पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे स्वरुप “पांडुरंग ऊस भुषण”साठी रक्कम रु.५१ हजार व पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कारसाठी रक्कम रु.११ हजार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे आहे. या पुरस्कारामध्ये विजेत्या शेतकऱ्यास सपत्निक गौरविण्यात येते.
” पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार ” विजेते शेतकरी
गळीत हंगाम २०१९-२०
अ.नं. | सभासदाचे नांव | गांव | गटाचे नांव |
१ | श्री राणू मधुकर पाटील | आव्हे | भोसे |

गळीत हंगाम २०२०-२१
अ.नं. | सभासदाचे नांव | गांव | गटाचे नांव |
१ | अनिता काशिनाथ घाडगे | देगांव | देगांव |

ही योजना कारखान्याने मागील तीन हंगामापासून सुरु केलेली असून, या योजनेमध्ये संपुर्ण कारखाना कार्यक्षेत्रातून ”पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कारासाठी सभासदाची निवड केली जाते. गळीत हंगाम २०१९-२० मध्ये १० सभासद व गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये १० सभादांनी भाग घेतला होता. त्यामधुन गळीत हंगाम २०१९-२० चा ”पांडुरंग ऊस भुषण” राणू मधुकर पाटील रा.आव्हे यांना व गळीत हंगाम २०२०-२१ चा ”पांडुरंग ऊस भुषण” अनिता काशिनाथ घाडगे रा.देगांव यांना जाहीर करणेत आलेला आहे.
” पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” विजेते शेतकरी
गळीत हंगाम २०१९-२०
अ.नं. | सभासदाचे नांव | गांव | गटाचे नांव |
१ | श्री.महादेव चंदुलाल घाडगे | देगाव | देगाव |
२ | श्री.ईश्वरा चांगदेव धुमाळ | कौठाळी | भाळवणी |
३ | श्री.नानासो ज्ञानोबा सरवळे | मेंढापूर | भोसे |
४ | श्री.लक्ष्मण श्रीरंग ढोबळे | उंबरे पागे. | करकंब |
५ | श्री.लक्ष्मण विठोबा दावले | कासेगाव | पंढरपूर |

गळीत हंगाम २०२०-२१
अ.नं. | सभासदाचे नांव | गांव | गटाचे नांव |
१ | गोकुळ बळीराम घाडगे | देगांव | देगांव |
२ | राजकुमार विष्णु रेडे | गादेगांव | भाळवणी |
३ | ज्ञानेश्वर रामचंद्र गोसावी | नेमतवाडी | भोसे |
४ | भगवान साधु नरसाळे | जळोली | करकंब |

” पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” यामध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्रातील एकुण सात गटामधुन प्रत्येकी एका सभासद शेतकऱ्यास ” पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” पुरस्काराने सन्मानित करणेत येते. यामध्ये सन २०१९-२० मध्ये १८ व २०२०-२१ मध्ये २८ सभासद शेतकऱ्यांनी भाग घेतला होता.यामध्येही प्रत्येक गटामधुन कमीत-कमी खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा व अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास प्रत्येकी रक्कम रु.११ हजार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा देऊन सपत्निक गौरविण्यात येणार आहे.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.श्री यशवंत कुलकर्णी हे म्हणाले की, ही स्पर्धा आम्ही गेले तीन वर्षापासून मा.आ. कै.सुधाकरपंत परिचारक यांचे संकल्पनेमधुन व कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली चालू केलेली आहे. स्पर्धेची सुरुवात लागण हंगाम सुरु झालेनंतर करीत आहोत.जे शेतकरी पुर्व हंगाम व सुरु हंगामामध्ये ऊसाच्या लागणी करतात ते या स्पर्धेसाठी पात्र होते.या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा शेतकरी कारखान्याचा सभासद असणे आवश्यक आहे. कारखान्याने ठरवून दिलेल्या को-८६०३२, कोसी-६७१, vsi-०८००५ या ऊस जातींचीच ऊस लागण करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील शेतकऱ्यांनी ऊसाची लागण केल्यापासून ऊस तोडणीपर्यंत १०० गुणांची तपासणी विविध मुद्यांचे आधारे करणेत येऊन हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पुढे ते म्हणाले ऊस लागण करतेवेळी पुर्व मशागतीपासून माती परिक्षण, चांगल्या बेणेमळ्यातील बेणेचा वापर, हिरवळीची खते, शेणखताचे स्लरीचा वापर, ठिबक सिंचन, जिवाणु खतांचा वापर, विविध द्रवरुप खतांच्या फवारण्या या सर्व बाबींचे मुल्यमापन करणे करीता स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमनुक करणेत आली होती. या सर्व शेतकऱ्यांची स्वतंत्रपणे आलेला खर्च याच्या तपशीलवार नोंदी वर्षभर ठेवण्यात आलेल्या होत्या. यामधुन सर्वात कमी खर्च व अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
पुरस्काराचे वितरण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कारखान्याचे दि.३०-०९-२०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाईन वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये स.१० वाजता कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये करणेत येणार आहे.
ही नाविन्यपुर्ण स्पर्धा सोलापूर जिल्ह्याचे आ.प्रशांत परिचारक यांचे व कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे मुल्यमापन करणेत आले. स्पर्धेतील शेतकऱ्यांना मा.कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, केन मॅनेजर संतोष कुमठेकर, व ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, यांनी ऊस पीक घेत असताना विविध स्तरावरती मार्गदर्शन केले होते.
डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार, परंपरेनुसार कारखाना चालू असून सन २०१९-२० मधील ”पांडुरंग ऊस भुषण” व ”पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” कोवीड १९ च्या परिस्थितीमुळे देता आले नाहीत. त्यामुळे सन २०१९-२० व २०२०-२१ या हंगामासाठी हे पुर्व नियोजित पुरस्कार ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवार दि.३०-०९-२०२१ रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून देत आहोत.
आ.प्रशांत परिचारक, चेअरमन पांडुरंग सहकारी