माळशिरस तालुक्यात कोरोना उपाययोजनांची कडक अंमलबजावणी; संयुक्त पथकांने विविध ठिकाणी केली कारवाई.

व्यक्तीं तसेच आस्थापनाकडून २१ हजार रुपये एवढा दंड वसूल.
टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना नियमांचे पालन न करणार्यावरती पोलीस, महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली या कारवाईत ९१ व्यक्तीं तसेच आस्थापनाकडून २१ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला असून या पुढेही तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी कोरोना संबंधी नियम न पाळणाऱ्या व्यक्ती व आस्थापनायांचेवर अशाच प्रकारची कारवाई करणेत येणार असल्याची माहिती प्रशनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालणेकामी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि.१६ मार्च रोजी तहसिल कार्यालय माळशिरस येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने आज माळशिरस, अकलूज, नातेपुते, वेळापूर, पिलीव, दहिगाव या गावांमध्ये महसूल पोलीस व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांनी कारवाई केली या कारवाई मध्ये ९१ व्यक्तीं व आस्थापनाकडून २१ हजार रुपये एवढा दंड वसूल करणेत आला.

पोलीस, महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाच्या कारवाईत आज तालुक्यात दुकाने, पानटपरी, आठवडा बाजार, सलून आदी ठिकाणांची तपासणी करणेत आली.