‘पांडुरंग सहकारी’च्या ३१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन.

टीम: विजयदिप न्यूज.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादित केलेल्या ३१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते तसेच व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, हरिषदादा गायकवाड, शिवाजीराव साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, बाळासो यलमार, तानाजी वाघमोडे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, दिनकरराव कवडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, नागन्नाथ शिंदे, संगीता पोरे, पार्वती नरसाळे, सिंधू पवार, भिमराव फाटे, अरुण घोलप आदि मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, चालू गळीत हंगामात कारखान्याकडे १४ लाख मे.टन ऊसाच्या नोंदी असून त्या सर्व ऊसाचे वेळेत गाळप करण्यात येईल कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होऊन ६ दिवसाचा कालावधी पुर्ण झालेला असून या हंगामात कारखान्याने ३७ हजार मे.टन गाळप करुन ३१ हजार १११ क्विंटल पोती साखर उत्पादन केली आहेत. सध्या कारखान्याचा साखर उतारा ८.९६ टक्के आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, या हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालणार असून प्रतिदिन ७ हजार २०० मे.टना पर्यंत गाळप करणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत गाळप होणार आहे.
पोती पूजन कार्यक्रमास वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, केन मॅनेजर एस. सी. कुमटेकर, चीफ अकौंटंट आर. एम. काकडे, सिव्हील इंजि. एच. एस. नागणे, डिस्टीलरी मॅनेजर एस. ई. शेख, मटेरिअल मॅनेजर एम. जे. देशपांडे, वैद्यकिय निवासी अधिकारी एस. एस. पोफळे, को-जन मॅनेजर एस. एस. विभुते, ऊस विकास अधिकारी एस. पी. भालेकर, डे.चिफ.इंजी. ए. डी. बारटक्के, डे.चिफ.केमिस्ट एम.एल.उपासे, कॉम्प्युटर इंचार्ज टी. एस. भोसले, स्थावर अधिकारी आर. डी. गाजरे, हेड टाईम किपर एस. एन. कदम, इन्युट्रमेंट मॅनेजर एस. वाय. सय्यद, सहा.कार्यालयीन अधिक्षक बी.एस.बाबर आदि उपस्थित होते.