सोलापूर जिल्हा

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया पुर्ण.

आता खरे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणावरती.


विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यातील नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये ४९ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०१९  पासून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र यानंतर कोरोना महामारी मुळे ही प्रक्रिया थांबली होती. नुकतीच २ नोव्हेंबर रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली असुन तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या  प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण अंतीम नमुना ‘अ’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात १८ ग्रामपंचायती मधून ४३ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतीवरती  उपविभागीय अधिकाऱ्यांनी विचार करून कायदेशीर बाबी तपासून निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अंतिम प्रभाग रचना नमुना ‘अ’ प्रमाणे निश्चित करून सदर माहीती तलाठी, मंडल अधिकारी व तहसिल कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती माळशिरसचे नायब तहसिलदार तुषार देशमुख यांनी दिली.
दरम्यान गावातील नेतेमंडळींचे खरे लक्ष आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले असुन लवकरच सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. माळशिरस तालुक्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुक रणसंग्राम सुरु होणार आहे. त्यामुळे आत्ता तालुक्यातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या गावात मोर्चेबांधणीला वेग येऊ लागलेला पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायती, त्यांची प्रभाग संख्या व सदस्य संख्या खालील प्रमाणे

अ.नंग्रामपंचायत नावप्रभाग संख्यासदस्य संख्या
१.पिंपरी४११
२.कोंडबावी४११
३.कुसमोड३९
४.महाळुंग६१७
५.पिरळे४११
६.बोरगाव५१५
७.मोरोची५१३
८.खळवे३७
९.कळंबोली३९
१०.गिरवी४११
११.फोंडशिरस६१७
१२.विठ्ठलवाडी३७
१३.गिरझणी४११
१४.अकलूज६१७
१५.कुरबावी३९
१६.माळखांबी३९
१७.भांब३९
१८.नातेपुते६१७
१९.कोथळे३९
२०.संग्रामनगर५१५
२१.बांगर्डे३९
२२.चाकोरे४११
२३.रेडे४११
२४.बोंडले३९
२५.तोंडले३९
२६.दसूर३९
२७.बचेरी४११
२८.शिंगोर्णी४११
२९.फडतरी४११
३०.गणेशगाव३७
३१.बाभूळगाव३९
३२.गोरडवाडी४११
३३.जळभावी३९
३४.विझोरी४११
३५.एकशिव४११
३६.तांदुळवाडी६१७
३७.उंबरे(वे)३९
३८.मिरे३९
३९.मळोली५१५
४०.शेंडेचिंच३७
४१.तांबवे४११
४२.बिजवडी३७
४३.गारवाड४११
४४.येळीव३७
४५.मांडवे६१७
४६.विजयवाडी३९
४७.लोणंद३९
४८.शिंदेवाडी४११
४९.मांडकी३९
तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायती पैकी महाळुंग, फोंडशिरस, अकलूज, नातेपुते, तांदुळवाडी, मांडवे या सहा ग्रामपंचायती मोठ्या ग्रामपंचायती असून त्यांची सदस्य संख्या १७ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!