महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील वीजेचा प्रश्न मार्गी लावू – आ.राम सातपुते.

टीम विजयदिप न्यूज.

      उन्हाची तीव्रता वाढत चालली असून शेतात ऊस, गहू, हरभरा, मका, केळी, द्राक्ष, डाळींब आदी पिके उभी आहेत. त्यांना पाणी देण्यासाठी वीज वेळेवर मिळत नाही. राहोत्री नादुरुस्त झाला तर बदलून मिळत नाही. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलून हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आ.राम  सातपुते यांनी दिली ते वेळापूर येथे बोलत होते.

            आ.राम सातपुते यांनी वेळापूर येथे भेट दिली. यावेळी त्यांचा माजी सरपंच माणिकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी वेळापूर व दसूर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्या . 

            आळंदी-पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु असून या राष्ट्रीय महामार्गातच श्री.संत ज्ञानेश्वर व श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग येत आहे. या पालखी महामार्गात धर्मपुरी व दसूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी धर्मपुरी शाळेसाठी शासकीय जागा उपलब्ध झाली असून दसूर शाळेच्या जागेचा प्रश्न अनूत्तरीतच आहे. याबाबत उपसरपंच धनंजय सावंत व मुख्याध्यापक किरण काळे यांनी आ.राम सातपुते यांची वेळापूर येथे भेट घेवून शाळेच्या जागेचा प्रश्न सोडवावा. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चार जागा दाखविल्या परंतु एकाही जागेचा प्रश्न त्यांनी सोडविला नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगावे अशी मागणी केली असता जिल्हा परिषदेकडे याबाबत चौकशी करुन शाळेसाठी जागा खरेदी करण्यास सांगु असे आ.सातपुते म्हणाले. 

            वेळापूर येथे जेष्ठ नागरीकांसाठी सभागृह बांधून द्यावे, अकलूज ते साळमुख या रस्त्याचे काम थांबले आहे ते मार्गी लावावे, महावितरण कडून विज बीलाबाबत तगादा लावला जातो परंतु राहोत्री नादुरुस्त झाला तर बदलून मिळत नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा आदी मागण्या भाजपाचे उपाध्यक्ष अमरसिंह माने-देशमुख यांनी केल्या. याबाबत तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावू असे आ.सातपुते म्हणाले . 

            यावेळी  ओंकार माने-देशमुख, माणिकराव चव्हाण, शंकर काकुळे, विरकुमार दोशी, उमेश भाकरे, दीपक राऊत, अजित साठे, मिलींद सरतापे, गणेश म्हेत्रे, आकाश म्हेत्रे, स्वप्नील सरवदे, डॉ.शिवाजी चौगुले, हनुमंत मेलगे, हरिभाऊ माने, नाना माने, विकास माने, गणेश आडत, अनिकेत भाकरे, दादा मगर, प्रलय खराडे, गोरख पिसे, महेश काळे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!