आ.बबनदादा शिंदे व सुनंदाताई शिंदे यांनी ५० हजार ऊस तोडणी मजुरांची दिवाळी केली गोड.

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा दिपावलीनिमित्त स्तुत्य उपक्रम.
२० टन लाडू व १० टन चिवड्याचे अठरा हजार मजूर कुटुंबांना वाटप.
बेंबळे/मुकुंद रामदासी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस तोडणीसाठी आलेल्या १८ हजार कुटुंबातील ५० हजार मजुरांना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनदादा शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनंदाताई शिंदे यांचे हस्ते एकूण ३० टन लाडू-चिवड्याच्या फराळाचे वाटप करून मजुरांची दिवाळी गोड केली.

याबाबत सविस्तर माहिती देताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सामाजिक उपक्रम राबवण्यास नेहमीच अग्रेसर असतो, कारखान्याच्या पिंपळनेर (ता.माढा) युनिट नं.१ व करकंब (ता.पंढरपूर) युनिट नं.२ च्या ऊस गळीत हंगामासाठी सध्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागातून १८ हजार मजूर कुटुंबीय दाखल झाले आहेत, त्यांचे मध्ये स्त्री-पुरुष असे एकूण ५० हजार व्यक्ती असून त्यांना दिपावली सणाचा आनंद लाभावा व या सणाचा गोडवा मिळावा म्हणून प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी देखील या १८ हजार तोडणी मजूर कुटुंबाला लाडू-चिवड्याच्या फराळाचे वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये बैलगाडी कुटुंबाला ५ किलो बुंदीचे लाडू व ३ किलो चिवडा, ट्रॅक्टर गाडीच्या (बजाट) कुटुंबाला १० किलो लाडू व ५ किलो चिवडा तसेच ट्रक व ट्रॅक्टर-ट्रेलर मजुरांना २० किलो लाडू व १० किलो चिवडा अशा फराळाचे वाटप करण्यात आले.
५० हजार मजुरांसाठी १५० आचार्यांनी चार दिवस रात्रंदिवस मेहनत करून २० टन लाडू व १० टन चिवडा असे एकूण ३० टन फराळाचे वेगवेगळे पॅकिंग तयार करण्याचे काम केले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव व केन मॅनेजर संभाजी थिटे यांनी दिली.
या फराळ वाटपाप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन वामन भाऊ उबाळे, संचालक नीलकंठ पाटील, लाला मोरे, पांडुरंग घाडगे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, केन मॅनेजर संभाजी थिटे, फायनान्स मॅनेजर दिलीप लवटे आदी मान्यवरासह वाहन मालक, मुकादम व मजूर उपस्थित होते.
माणुसकीचा गोडवा यापूर्वी पाहिला नाही….!
मागील पंधरा वर्षापासून मी बऱ्याच साखर कारखान्यावर ऊस तोडणी साठी मजूर म्हणून गेलो होतो, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा नावलौकिक ऐकून येथे ऊस तोडणीसाठी जायचेच असे ठरऊन येथे आलो आहे. दिवाळीनिमित्त आम्हा कुटुंबीयांना लाडू चिवड्याचे पाकीट मिळाले व आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला, असा माणुसकीचा गोडवा व आनंद यापूर्वी कोणत्याही साखर कारखान्यात आलेला नाही.
गंगाधर कल्याण सोलनकर,
रा.उरण, ता.आंबाड, जि.जालना
ऊस तोडणी मजूर.



