जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांसाठी ६४ लाखांचा निधी मंजूर – आ.बबनदादा शिंदे.

पंढरपूर तालुक्यासाठी ४४ लाख व माळशिरस तालुक्यासाठी २० लाखांची तरतूद.
टिम: विजयदिप न्यूज.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ मधून माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यासाठी ४४ लाख व माळशिरस तालुक्यासाठी २० लाख निधी विविध ठिकाणच्या रस्ता सुधारणा कामांसाठी मंजूर झाल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ३०५४-२०८१ या लेखाशिर्ष अंतर्गत मंजूर निधीतून पंढरपूर तालुक्यातील शेवते ते खळगे वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी ३२ लाख, नारायण चिंचोली ते कागदे वस्ती १२ लाखांची तरतूद केली आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील वाघोली रस्ता ते गणपत भोसले वस्ती रस्ता सुधारण्यासाठी १० लाख, वाघोली रस्ता ते मिसाळ-पाटील वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी १० लाख निधीची तरतूद केली आहे.
या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार असून या भागातील लोकांची गैरसोय दूर होणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.