सोलापूर जिल्हा

अकलूज पोलीसांकडून अवैध धंद्यावरती कारवाईचा सपाटा.

गांजा विक्री करणार्‍या इसमांवर अकलूज पोलीसांची कारवाई.

टीम विजयदिप न्यूज.

अकलूज (ता.माळशिरस) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावंकर यांच्याकडून अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या हद्दीत बेकायदा धंदे उध्वस्त करण्याचे सत्र सुरूच असून पोलीस निरीक्षक सुगावंकर यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गांजा विक्री करणार्‍या इसमांवर अकलूज पोलीसांनी कारवाई केली असून अवैध धंद्यावरती होत असलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस निरीक्षक अरुण सुगावंकर यांना गुप्त बातमीदारामार्फत नागोबाचे मंदिराचे कटयाजवळ जुना बाजारतळ, विकास नगर येथील पत्रा शेडमध्ये एक इसम गांजाची विक्री करत असलेबाबत बातमी मिळाली. लागलीच सुगावंकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना कळवून पोलीस कर्मचारी, इलेक्ट्राॅनिक वजन काटा, लेखणी साहित्य, पंच, संपूर्ण सीलचे साहित्य असे नागोबाचे मंदिराचे कटयाजवळ, जुना बाजारतळ विकासनगर येथे गेले असता पत्रा शेडमध्ये एक इसम पांढरे रंगाची पिशवी घेवून बसलेला दिसला.

सदर इसमास जागीच पकडून त्याचे नांव विचारले असता शंकर देविदास पिसाळ (वय ४५ वर्षे), (रा.नागोबाचा कट्टा, जुना बाजारतळ, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर) याने त्याचे ताब्यातील पिशवीमध्ये १२ हजार ७५० रुपये किंमतीचा मोकळा ८५० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा व  १ हजार ३२० रुपये किंमतीचा ९ लहान प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये पॅक केलेला ८८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा असा एकुण १४ हजार ७० रुपये किंमतीचा ९३८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीविरुध्द एन.डी.पी.एस. कलम ८(क), २०(ब)(पप)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुजचे बसवराज शिवपुजे, मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर, सोबत स.पो.नि. सुनिल जाधव, मपोसई सारिका शिंदे, ए.एस.आय. बबन साळुंके, पोहेकाॅ/४०९ सुहास क्षिरसागर, पोहेकाॅ/३८२ रामचंद्र चैधरी, पोना/१८२५ निलेष काशीद, पोना/९९९ सोमनाथ कोळी, पोकाॅ/६१७ नितीन लोखंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक सुनिल जाधव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!