इतर

महाळूंग येथील विविध विकास कामांसाठी ५० लाख निधी मंजूर – आ.बबनराव शिंदे .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना

टीम: विजयदिप न्यूज.

माढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी विविध योजनांमधून निधी मिळविणेसाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून माढा मतदारसंघातील समाविष्ठ असलेल्या माळशिरस तालुक्यातील मौजे महाळुंग येथील ७ कामांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत ५० लाख  रूपयांचा निधी मंजूर झालेला असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आ.शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीतील/गावातील पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, गटर बांधणे, स्मशान भूमिचा विकास करणे, पथदिवे, पर्जन्य पाण्याचा निचरा, सार्वजनिक सुलभ शौचालये, व्यायाम शाळा इत्यादी कामांना शासन स्तरावर मंजूरी देणेत येत आहे. ग्रामीण भागातील विकास कामे करणेसाठी  वेगवेगळ्या शासकीय योजनामधून निधी मिळणेसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरुच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील महाळुंग गावातील ७ कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे सहकार्य लाभले आहे. या गावामध्ये भुमिगत गटार केल्यास पाण्याची विल्हेवाट व्यवस्थीत होणार आहे. गाव स्वच्छ राहणार असून परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असे आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजविकास योजना सन २०२१-२२ मंजूर कामे

अ.नंकामाचे नावमंजूर निधी
१महाळुंग येथील आनंदनगर येथे भुमिगत गटार बांधणे१० लाख.
२महाळुंग येथील जिजामाता नगर येथे भुमिगत गटार बांधणे१० लाख.
३महाळुंग येथील गट नं.२ येथे भुमिगत गटार बांधणे१० लाख
४महाळुंग येथील शाहूनगर येथे भुमिगत गटार बांधणे५ लाख.
५महाळुंग येथील बिरुनगर येथे भुमिगत गटार बांधणे५ लाख.
६महाळुंग येथील साईनगर येथे भुमिगत गटार बांधणे५ लाख.
७महाळुंग येथील जगदिशनगर येथे भुमिगत गटार बांधणे५ लाख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!