सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बीलाचे वाटप सुरु.- चेअरमन कल्याणराव काळे.

टीम विजयदिप न्यूज.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.२ हजार रुपये व सन २०१८-१९ मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन २०१८-१९ मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.५०० रुपये प्रमाणे रक्कम निशिगंधा सहकारी बँक, पंढरपूर येथे गटवार ऊस बीलाचे वाटप सुरु आहे. अशी माहिती सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा सिताराम महाराज साखर कारखान्याचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांनी दिली.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ मधील ऊस उत्पादक शेतकर्यांचा दि.१७ नोव्हेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या पंधरवडा मध्ये गळीतास आलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रती मे.टन.रु.२ हजार रुपये प्रमाणे सुरु असून गळीत हंगाम २०१८-१९ मधील शेतकर्यांची उर्वरीत एफआरपी रक्कम ही दि.२४ डिसेंबर २०२० पासून पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेतून गट वाईज वाटप करण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बीले कमिशनसह प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था, पंढरपूर येथे गट वाईज सुरु करण्यात आलेले आहेत. सिताराम महाराज साखर कारखाना, खर्डी चे सन २०१८-१९ मधील ऊस बीलाच्या एफआरपी पोटी प्रती मे.टन रु.५०० रुपये प्रमाणे सोमवार दि.२१ डिसेंबर २०२० पासुन गटवाईज पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँक येथे वाटप सुरु करण्यात आले असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
सहकार शिरोमणी व सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना आपल्या गटानूसार बीलाचे वाटप करण्यात येणार असून बँकेत कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जास्त गर्दी होवू नये म्हणून कारखान्याच्या शेती विभागामार्फत संबंधीत शेतकर्यांना ऊस बीला संदर्भात निरोप दिल्यानंतरच बँकेत जावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.