महाराष्ट्र

आ.भाई जगताप मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष;

चरणसिंह सप्रा कार्यकारी अध्यक्ष.

टीम विजयदिप न्यूज.

      मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य आ.भाई जगताप यांची वर्णी लागली असून चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आ.भाई जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

      काल शनिवार दि.१९ डिसेंबर रोजी रात्री अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं ही नियुक्ती जाहीर केली असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांस मंजुरी दिली आहे.

      मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या शर्यतीत मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांचा ही समावेश होता. परंतु मराठा समाजामधून असणारे आ.भाई जगताप यांचा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!