अखेर करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला यश;

धवलसिंह मोहिते-पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध.
टीम विजयदिप न्यूज.
मागील कांही दिवसांपासून करमाळा तालुक्यातील अनेक गावात धुमाकूळ घालत असलेल्या तसेच तालुक्यातील तीन जणांचे प्राण घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश आले आहे.
सदर नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला यश आले असून करमाळा तालुक्यातील वांगी नं.४ येथील रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले आहे. डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. आणि अखेर बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश आले. मागील बर्याच दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यातील अनेक गावात दहशत पसरली होती.

अकलूजचे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून या मोहीमेत सामील झाले होते. वांगी नं-४ येथे केळीच्या बागेत बिबट्याला वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला असता अतिशय सावध असलेल्या मोहिते-पाटील यांनी १५ फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर ३ गोळ्या झाडल्या व बिबट्याला ठार केले.
बारामती येथील शार्पशूटर तावरे यांना बोलवण्यात आले होते. त्यांचे सहकारी म्हणून अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. आज अखेर या मोहिमेला यश आले आहे.