सोलापूर जिल्हा
टेम्पोने ठोकरल्याने वाहतूक शाखेच्या पोलीसाचा जागीच मृत्यू.

टीम: विजयदिप न्यूज .
वरवडे ( ता.माढा ) येथील टोल नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास भरधाव टेम्पोने ठोकरल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे असे मयत पोलीस कर्मचार्याचे नाव आहे.
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्यावर टेंभुर्णी च्या दिशेने निघालेल्या टेम्पोला थांबवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस नाईक चोबे यांनी हात केला होता. यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने चोबे यांना ठोकरले यात चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. आज (रविवारी) सायं ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला. टेम्पो आणि चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

टेम्पो क्रमांक (Mh04, HD 0170) हा हैदराबाद हुन मुंबईला मेडिसीन घेऊन निघाला होता. टेम्पो चालक आरोपी नवनाथ शिवाजी गुट्टे ( रा.परळी वैजनाथ, जि. बीड ) यास अटक करण्यात आले आहे.