सांगोला येथे मेरी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योगा मेडिटेशन चे मोफत वर्ग.

विजयदिप न्यूज.

आजकाल कमी वयातही मधुमेहाची लागण झालेले अनेक लोक आपल्याला पहायला मिळतील. शरीरातील इन्सूलीनची निर्मिती होण्याचे प्रमाण घटले की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका पार पाढतो. यासाठीच सांगोला येथील “मेरीगोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल” मध्ये योगा व मेडिटेशन चे मोफत क्लास आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्य प्रा.कल्पना गोडसे यांनी दिली.
योगाचे बरेच फायदे असून शरीराच्या व्याधी कमी होण्यासाठी, मानसिक स्थिती खंबीर होण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे. योगामुळे रक्त संचलन प्रक्रिया सुधारते, पचनक्रिया आणि मानसिक शांतता आपल्याला लाभते. याचा राहणीमानात बदल होतो. आजकालची जीवनशैली धकाधकीची असल्याने मनुष्याला लगेच राग येतो तसेच त्याची चिडचिड देखील होते. हे सर्व नियंत्रणात राहण्यासाठी महिलांचे व मुलांचे योगा दि.१० डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले असून या क्लास मध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अलीकडच्या काळात महिलांमध्ये नोकरी, व्यवसाय व अन्य कारणांमुळे ताणतणाव वाढत आहेत यामुळे शरीराचे अनेक आजार बळावतात यामुळे योगा व मेडिटेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
योगा व मेडिटेशन क्लास नोंदणी साठी प्रा.कल्पना गोडसे ९३५६९७९८४९ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. सदरचे क्लास हे विनामूल्य घेण्यात येणार आहेत. हे क्लास मेरीगोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल कर्मवीर नगर रोड नं.१ येथे संपन्न होणार असून सांगोला व परिसरातील महिलांनी व मुलांनी या क्लास चा लाभ घेण्याचे आवाहन स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.