राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सोलापूर जिल्हा कार्यकारणी बरखास्त – अॅड.गणेश पाटील.

लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार.
संकल्प डोळस यांच्या निवास्थानी अॅड.गणेश पाटील यांचा सत्कार.
विजयदिप न्यूज.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे नुतून जिल्हाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी दिल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस यांच्या वतीने दसुर (ता.माळशिरस) येथे अॅड.गणेश पाटील यांचा सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार ठेवण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

त्यावेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, अक्षय भांड आदी उपस्थित होते.
पुढे अॅड.गणेश पाटील म्हणाले, आज जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका व शहर कार्यकारणी बरखास्त केली असून त्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. येत्या पंधरा दिवसात दिवाळीच्या अगोदर नवीन कार्यकारिणी स्थापन करणार आहे. तसेच नव्या जुन्याची सांगड आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन नवीन कार्यकारिणी स्थापन करणार आहे. आम्ही नक्कीच जिल्हा संघटना बळकट करू जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने काम चालू केले आहे. असे करताना नव्या जुन्याची सांगड घालून व सर्व युवकांना बरोबर घेऊन आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सोलापूर जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही दौरे सुरू केले आहेत. असेही ते म्हणाले.
