वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीतर्फे अनंत क्षिरसागर यांचा सत्कार.

विजयदिप न्यूज.
वेळापूर (ता.माळशिरस) येथील पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख आणि व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उप डाकघर वेळापूर येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक विभाग, महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमधून “बेस्ट पोस्टमन” म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
अनंत क्षिरसागर यांनी डाक विभागात सलग ३९ वर्ष खुडूस आणि वेळापूर येथे सेवा केली आहे, लवकरच त्यांना मुंबई येथे “बेस्ट पोस्टमन” म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी निवृत्ती बनकर, रंगनाथ माने, ज्ञानदेव सोनवणे, बालम कोरबु, तुकाराम शिंदे, शिवाजी मोहिते, सुरज साखरे, नितीन सावंत, बाळू बनसोडे, महादेव शिंदे, संस्थासचिव भागवत मिले, सोमनाथ सावंत, संतोष सावंत, शिवाजी आडत, दत्ताञय म्हेञे आदि. उपस्थित होते.