माळशिरस तालुकाशेतीविषयकसोलापूर जिल्हा

डॉ.यशवंत कुलकर्णी यांची शासनाच्या अभ्यास गटाच्या सदस्यपदी निवड.

विजयदिप न्यूज

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांची शासनाने नियुक्त केलेल्या ऊस तोडणी वाहतूक खर्चाचे निर्धारण करण्याबाबतच्या समितीच्या शासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

साखर आयुक्त यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऊस तोडणी वाहतूक खर्चाचे निर्धारण करण्याबाबत समिती गठीत केली असून या शासकीय समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकमेव ‘पांडुरंग सहकारी’चे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांची शासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

राज्यात प्रचलित पद्धतीनुसार साखर कारखाने ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा उभारणी करून शेतक-यांच्या वतीने त्यांच्या ऊसाची तोडणी व वाहतुक केली जाते. सदर ऊस तोडणी व वाहतुकपोटी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतक-यांच्या रास्त व किफायतशीर दराच्या एफआरपी देय रक्कमेतून कपात केली जाते. अशाप्रकारे केंद्र शासनाने संबंधित गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या रास्त व किफायतशीर दरामधून सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा करून रास्त व किफायतशीर दर ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करण्यात येतो. 

डॉ.यशवंत कुलकर्णी यांची या समितीवर निवड झाल्याबद्दल चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, दिनकरराव मोरे, दिलीप चव्हाण, बाळासाहेब यलमार व सर्व संचालक तसेच सभासद शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!