महामार्गावरती वाहनास लुटणारी टोळी गजाआड; वेळापूर पोलिसांची कामगिरी

जबरी चोरीतील आरोपींना केले दोन तासात जेरबंद.
विजयदिप न्यूज
साळमुख ते सांगोला मार्गावर वाहने अडवून जबरी चोरी करणार्या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली असून वेळापूऱ (ता.माळशिरस) पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अजित सुभाषराव जाधव (वय-२८, रा.मळोली, ता.माळशिरस), सुहास समाधान यादव (वय-२३, रा.तांदुळवाडी, ता.माळशिरस) आणि महेश विष्णु कदम (वय-२२, रा.तांदुळवाडी, ता.माळशिरस) याचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फळवणी (ता.माळशिरस) शिवारात साळमुख ते सांगोला रोडवरून वाहन चालक शुभम तिलोकसिंह यादव हे ट्रक घेवून चालले असताना त्यांना फळवणी शिवारात असणार्या कालव्याजवळ रोडवर तीन जणांनी वाहन चालकास वाहन आडवून, शिवीगाळ दमदाटी करून खाली ओढून हाताने मारहाण केली व तुझ्याकडील पैसे काढून दे, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशा प्रकारची धमकी देवून खिशातील १ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस पथकाने फिर्यादीने दिलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचा शोध घेतला असता साळमुख चौकात पोलीसांना पाहताच आरोपी पळू लागल्यानंतर त्यांचा पाटलाग करून त्यांना पकडले.

याबाबत वेळापूऱ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं १२/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपी अजित सुभाषराव जाधव (वय-२८, रा.मळोली, ता.माळशिरस), सुहास समाधान यादव (वय-२३, रा.तांदुळवाडी, ता.माळशिरस) आणि महेश विष्णु कदम (वय-२२, रा.तांदुळवाडी, ता.माळशिरस) यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव, अकलूजचे उपविभागील पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, वेळापूऱ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, पोहेकॉ उमाजी चव्हाण, पोहेकॉ दिपक मेहेरकर, पोना अमोल वाघमोडे यांनी सदरची कामगिरी केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत करीत आहेत.