‘पांडुरंग सहकारी’चे एम.आर. कुलकर्णी बेस्ट चिफ केमिस्ट पुरस्काराने सन्मानित.

टिम: विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चिफ केमिस्ट एम. आर. कुलकर्णी यांना ‘भारतीय शुगर’चा बेस्ट चिफ केमिस्ट पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
पुरस्कार साखर आयुक्त शेखर गायकवाड, भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, उपाध्यक्ष संग्राम संग्रामसिंह शिंदे, भारतीय शुगर चे कौंसिल सदस्य तथा पांडुरंग सहकारीचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, भारतीय शुगरचे उपाध्यक्ष तथा जयवंत शुगर (कराड) चे प्रेसिडेंट चारूदत्त देशपांडे, जव्हार शुगर (कोल्हापूर)चे संस्थापक कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे, भारती विद्यापिठाचे डॉ.शिवाजी कदम, स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे एम.डी. चौगुले, लोकमंगल सोलापूरचे अविनाश महागांवकर यांचे हस्ते देण्यात आला.
एम. आर. कुलकर्णी यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात दीर्घ काळ केमिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर चिफ केमिस्ट म्हणून त्यांचे कारकीर्दीत कारखान्याच्या साखर उतार्या मध्ये चांगली सुधारणा होत अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्यात प्रथम कमांकाचा साखर उतारा राखण्यात यश आले. त्यांच्या या सेवेची दखल घेत साखर उद्योगात उत्तम कामगिरी करत असलेल्या अधिकारी व्यक्ती व संस्थाना मान्यता प्राप्त असणाऱ्या भारतीय शुगर तर्फे सन्मानित करण्यात येते.
त्या पार्श्वभूमीवर एम. आर. कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल पांडुरंग कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअनमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक मंडळ, अधिकारी, कामगार यांनी अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा दिल्या.