माळशिरस तालुका

‘पांडुरंग सहकारी’चे एम.आर कुलकर्णी यांना भारतीय शुगरचा बेस्ट चीफ केमिस्ट पुरस्कार जाहीर.

टिम: विजयदिप न्यूज.

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर एम आर कुलकर्णी यांना भारतीय शुगरचा बेस्ट चीफ केमिस्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. सदरच्या पुरस्काराचे वितरण दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली

भारतीय शुगर ही संस्था साखर उद्योगांमध्ये कार्य करीत असून साखर कारखान्यामध्ये उल्लेखनीय सर्वोच्च काम करणाऱ्या साखर कारखान्यामधील अधिकाऱ्यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना प्रत्येक वर्षी गौरवण्यात येते पुरस्कार देताना उल्लेखनीय काम केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा, त्यांचे साखर कारखानदारी मधील योगदान, त्यांनी राबवलेल्या नवनवीन कल्पना त्यामुळे साखर कारखानदारीला झालेला फायदा या सर्व गोष्टीचा विचार करून पुरस्कार दिला जातो अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

एम आर कुलकर्णी हे सुरुवातीपासून श्री.पांडुरंग सहकारीमध्ये असून त्यांनी कारखान्यामध्ये रसायन विभागात काम करीत असताना साखरेचा उतारा, साखरेचा एकुम्सा, कमीत-कमी केमिकल चा वापर करून कारखान्यामध्ये उच्च प्रतीची साखर तयार केली आहे त्यामुळे पांडुरंग कारखान्यास साखर विक्रीमध्ये चांगला दर मिळत असून कारखान्यास जास्तीचा फायदा होत आहे.

यावेळी कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर एम आर कुलकर्णी यांनी सांगितले की, भारतीय शुगरच्या या मिळालेल्या बेस्ट चीफ केमिस्ट या पुरस्कारामध्ये कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी सर्व संचालक मंडळ अधिकारी व कामगार यांनी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे मिळाला आहे

एम आर कुलकर्णी यांना भारतीय शुगरचा बेस्ट चीफ केमिस्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी तसेच अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!