माळशिरस तालुकाशेतीविषयकसोलापूर जिल्हा

‘पांडुरंग सहकारी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचा देशपातळावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.

टिम: विजयदिप न्यूज.

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास  सन २०२१-२२ या वर्षाकरीता को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने ६७ के.जी. बॉयलरच्या आतील को- जनरेशनसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला असुन ‘पांडुरंग सहकारी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोचला गेला आहे. या पुरस्कामुळे ‘पांडुरंग सहकारी’चा सन्मान उंचावलेला आहे.

पुरस्काराचे वितरण २७ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे केंद्रीय मंत्री रस्ते, परिवाहन तथा राजमार्ग (भारत सरकार) मंत्री नितीनजी गडकरी तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते होणार आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

यावेळी बोलताना चेअरमन परिचारक यांनी माहिती दिली की, को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया यांनी हंगाम २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर ६७ के,जी च्या आतील बॉयलर असणाऱ्या को-जनरेशन प्रकल्पास देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोकृष्ट पुरस्कार दिला आहे. त्यामध्ये श्री पांडुरंग कारखान्याने कमीत-कमी बगॅसमध्ये जास्तीत जास्त विज निर्मीती, अंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले कार्बन क्रेडीट, कमी उत्पादन खर्च, कारखान्यास मिळालेले आयएसओ सर्टीफिकेट व कारखान्याच्या असलेल्या सुरक्षा योजना, कारखान्याचा सौर उर्जा प्रकल्प, कमीत-कमी पाणी वापर, पाण्याचा पुर्णंवापर, पाचटाचा वापर करुन विज निर्मीती, को- जनरेशन प्लँटची क्षमता वापर या सर्व बाबीचा विचार करुन हा पुरस्कार जाहिर करणेत आला आहे. सदरचा पुरस्कार स्विकारण्यासाठी कारखान्याचे पदाधिकारी व अधिकारी जाणार आहेत.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, श्री पांडुरंग कारखान्याचा ज्यावेळी को-जन प्लँट उभा केला त्यावेळी महाराष्ट्रात को-जनरेशन प्लँटचे प्रमाण कमी होते परंतू कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक व संचालक मंडळाचे सहकार्याने कारखान्याचा को-जन प्लँट यशस्वी चालुन त्यामधुन जास्तीत-जास्त विज निर्मीती करुन कारखान्यास आर्थीक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. कारखान्याने को-जनरेशनमध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळेच कारखान्यास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडुन देशपातळीवरील सर्वोच्च को-जन प्लँट म्हणुन गौरविणेत येणार आहे. यापुढे कारखाना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यशाची अनेक शिखरे सर करेल.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे व संचालक यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी, कामगार यांचे अभिनंदन करुन पुढील कामास शुभेच्छा दिल्या.

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया हि संस्था को-जन प्लँट मध्ये काम करीत असून या हंगामापासुन ६७ के.जी च्या आतील बॉयलर क्षमता असलेले को-जनरेशन प्लँट व ६७ के.जी च्या जास्त बॉयलर क्षमता असेलेले को-जनरेशन प्लँट यांची विगतवारी करुन त्यांना देशपातळीवरिल बेस्ट को-जन प्लँट व बेस्ट को-जन मॅनेजर असे प्रत्येकी दोन पुरस्कार जाहिर केले आहेत.

डॉ.यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!