महाळूंग येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.

टिम: विजयदिप न्यूज.
महाळूंग (ता.माळशिरस) येथे साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिति, महाळूंग यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन, वृक्षारोपण तसेच लहाण मुलांना वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे-पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक राहुल रेडे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, अशोक चव्हाण, विक्रमसिंह लाटे, मोहसिन पठाण, मौला पठाण, आरपीआयचे नरेंद्र भोसले, शामराव भोसले, सागर यादव, महादेव वाघमारे, शुभम साठे, शिवाजी चव्हाण, बाबा चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.