धरण पाणीसाठामहाराष्ट्रशेतीविषयक

पावसाचा जोर कायम; धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ, जाणून घ्या धरणांची स्थिती.

टिम: विजयदिप न्यूज.

मागील कांही दिवसांपासून सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा जोर चांगलाच वाढत आहे. परिणामी संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुणे विभागातील भीमा व निरा खोर्‍यातील धरणांच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

आणखी कांही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे कांही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भीमा व निरा खोर्‍यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणांतील पाणीसाठे वाढत असल्याने ही दिलासादायक बाब आहे.

पुणे शहरात पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खडकवासला १०० टक्के भरलं,

तीन ते चार दिवसापासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच खडकवासला धरण साखळीमधील टेमघर, वरसगांव, पानशेत व खडकवासला या धरणांच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार व दमदार पावसामुळे खडकवासला धरण साखळीमधील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने १०० भरलेले आहे. त्याचबरोबर धरणात येणार्‍या पाण्याची आवक लक्षात घेऊन ११ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यामधून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला १ हजार क्युसेक असणार विसर्ग नंतर ३ हजार ४२४, त्यात पुन्हा वाढ करून तो ५ हजार ९९२ क्युसेक करण्यात आला त्यानंतर काल मंगळवार १२ जुलै दुपारी १ वाजता त्यात वाढ करून तो ११ हजार ९०० क्युसेक्स करण्यात आला होता. तो आज सकाळी ६ आजात १० हजार २४६ क्युसेस एवढा आहे.

उजनी प्लस मध्ये धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ.

सोलापूर, पुणे, नगर जिल्हयासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून उजणी धरण काल मंगळवार १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता मायनस मधून प्लस मध्ये आले आत्तापर्यंत धरणामध्ये ८.४६ टीएमसी पाणी आले आहे. आज बुधवार सकाळी ६ वाजता उजनीमध्ये दौंड येथून ४६ हजार ७५५ क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे. तसेच पुणे बंडगार्डन येथील विसर्ग २४ हजार ४१६ क्युसेक्स एवढा आहे.

भाटघर, निरा-देवघर, वीर व गुंजवणी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा आणि पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी तसेच पाणीपुरवठा व ओद्योगिक वापरासाठी महत्वाची असणार्‍या नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पाऊसामुळे या सर्व धरणात काल मंगळवारी सकाळी ६ ते आज बुधवार सकाळी ६ या २४ तासात तब्बल ३.१५ टीएमसी एवढ्या झपाट्याने पाणीसाठ्यात वाढ झाली होती.

भीमा खोर्‍यातील धरणांची स्थिति दर्शक तक्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!