धरण पाणीसाठामहाराष्ट्रशेतीविषयक

भीमा व नीरा खोर्‍यात दमदार पर्जन्यवृष्टी.

२४ तासात भीमा खोर्‍यातील धरणावर १६७७ मी.मी तर नीरा खोर्‍यातील धरणावर ३१४ मी.मी पावसाची नोंद.

टीम विजयदिप न्यूज.

मागील आठवड्यापासून भीमा व नीरा खोर्‍यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून मागील २४ तासात भीमा खोर्‍यातील सर्व धरणावर मिळून तब्बल १ हजार ६७७ मी.मी तर नीरा खोर्‍यातील सर्व धरणावरती मिळून ३१४ मी.मी पावसाची नोंद झाली असून या दोन्ही खोर्‍यातील धरणातील पाणीसाठे देखील झपाट्याने वाढत आहेत. तसेच खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणातील पाणीसाठा ९४.०८ टक्के एवढा झालेला असल्यामुळे या धरणाच्या सांडव्यामधून काल रात्री १२ वाजलेपासून विसर्ग मुठा नदीपत्रात सोडण्यास सुरवात झाली आहे.

भीमा खोर्‍यातील सर्वात मोठे धरण असणार्‍या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत असून मागील २४ तासात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात २.०२ टीएमसी वाढ झाली आहे. आज मंगळवार सकाळी ६ वा. धरणाची टक्केवारी उणे २.९६ टक्के एवढी आहे. उजणी धरण आज रात्री उशिरा उणे मधून अधिक मध्ये येण्याची शक्यता असून तिथून पुढे उजणीचा प्रवास पूर्ण क्षमतेने भरण्याकडे सुरू होईल.

दरम्यान आज मंगळवार १२ जुलै रोजी स.६ वा. बंडगार्डन पुणे येथील विसर्ग २२ हजार ५५ क्युसेक्स एवढा झाला असून उजनीत दौंड येथून ३० हजार ५२३ क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे यात वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर नीरा खोर्‍यातील गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात सुध्दा झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात या सर्व धरणात ३.१६ टीएमसी पाणीसाठा वाढला असून या सर्व धरणात मिळून आज मंगळवार स ६ वाजेपर्यंत १७.५३ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. तसेच सरासरी टक्केवारी ३६.२७ टक्के एवढी झाली आहे.

भीमा व नीरा खोर्‍यातील धरणांची स्थिति व सोडण्यात येत असलेला विसर्ग

भीमा व नीरा खोर्‍यातील धरणांची स्थिति व सोडण्यात येत असलेला विसर्ग.१२ जुलै २०२२ स.६ वा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!