इतर

माढा विधानसभा मतदारसंघातील गावांना विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर – आ.बबनदादा शिंदे.

टिम: विजयदिप न्यूज.

माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यामधील गावांतील गावाअंतर्गत मुलभुत सुविधा पुरविणेच्या राज्य सरकारच्या २५१५  या योजनेतंर्गत विकासकामे करणे करीता ग्रामीण भागातील कामासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे, वाड्या वस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण, खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार करणे, सामाजिक सभागृह, हायमास्ट दिवा बसविणे या सारखी अनेक विकास कामांसाठी शासनाकडे निधी मिळणेसाठी  मागणी केलेली होती. त्यास राज्य शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे  सहकार्य मिळाल्याचे सांगून निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ही कामे सुरू होणार असल्याचे आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

माढा तालुक्यातील १) आलेगांव (बु) – १० लाख, २) भिमानगर/रांझणी – १५ लाख, ३) वडाचीवाडी (अं.उ) – १० लाख, ४) बैरागवाडी – १५ लाख, ५) व्होळे (खु) – १० लाख, ६) उंदरगांव – १० लाख, ७) शिराळ (मा) – १० लाख, ८) चव्हाणवाडी (टें) – १० लाख, ९) जाधववाडी (मा) – १० लाख, १०) भुताष्टे – १० लाख, ११) भेंड – १० लाख, १२) उजनी (मा) – १० लाख, १३) तांबवे (टें) – १० लाख, १४) रोपळे (खु) – १० लाख, १५) आलेगांव (खु) – १० लाख,१६) वरवडे – १० लाख, १७) वडाचीवाडी (उ.बु) – १० लाख,१८) शिराळ (टें) – १० लाख, १९) पिंपळनेर – १५ लाख, २०) रणदिवेवाडी – १० लाख, २१) उजनी (टें) – १० लाख, २२) अकोले (बु) – १० लाख, २३) वेणेगांव – १० लाख, २४) बुद्रुकवाडी – १० लाख, २५) वेताळवाडी – १० लाख, २६) रुई – १० लाख, २७) निमगांव (मा) – १० लाख, २८) चिंचोली – १० लाख, २९) अकुंभे – १० लाख, ३०) निमगांव (टें) – २५ लाख रुपये

पंढरपूर तालुक्यातील १) पटवर्धन कुरोली – १० लाख, २) रोपळे (बु) – २० लाख, ३) नारायण चिंचोली – १० लाख, ४) शेगांव-दुमाला – १० लाख, ५) करोळे – १० लाख, ६) पिराची-कुरोली – १० लाख, ७) चिलाईवाडी – १० लाख, ८) सुस्ते – २० लाख, ९) चिंचोली (भोसे) – १० लाख, १०) देगांव – १० लाख, ११) अजनसोंड – १० लाख रुपये

माळशिरस तालुक्यातील १) माळखांबी – १० लाख, २) विठ्ठलवाडी – १० लाख, ३) खळवे – १० लाख, ४) बोरगांव – १० लाख रुपये याप्रमाणे कामाचा  सामावेश आहे.

सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षामध्ये कामे पूर्ण झालेल्या कामांचा निधी चार दिवसांत मिळणार.

सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षामध्ये २५१५ योजनेअंतर्गत ज्या गावांना निधी देण्यात आला  होता त्यामधील काम पुर्ण केलेल्या व ऑनलाईन बिले शासनाकडे दाखल केली आहेत अशा सर्व कामांचा निधी येत्या चार दिवसांत जमा होणार असल्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षातील कामांचा निधी मिळणेसाठी आ.बबनदादा शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून निधी मिळणेची मागणी केली होती त्याप्रमाणे चार दिवसात निधी वितरीत करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!