विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून २० मार्च अखेर गाळप झालेल्या ऊसाचे बिल अदा- आ.बबनराव शिंदे

प्रति टन २ हजार १०० प्रमाणे ऊस बिल अदा.
टिम: विजयदिप न्यूज.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब येथील सन २०२१-२२ गळीत हंगामामध्ये २० मार्च २०२२ अखेर गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन २ हजार १०० प्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.१ व २ चे ऊस गाळप सुरू असून आजअखेर युनिट नं.१ कडे १९ लाख ४० हजार ८७४ मे.टन विक्रमी ऊस गाळप केले आहे. युनिट नं.१ कारखान्याने सन २०१७-१८ हंगामामध्ये प्रस्थापित केलेला १९ लाख ३७ हजार ५९७ मे.टनाचा विक्रम मोडून सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामध्ये उच्चांकी ऊस गाळपाचा विक्रम प्रस्थापित करण्याकडे वाटचाल सुरू केलेली आहे. तसेच युनिट नं. २ कडे ५ लाख ९१ हजार २११ मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे २० मार्च अखेर गाळपास आलेल्या सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रति मे.टन रू.२ हजार १०० प्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे. या गळीत हंगामामध्ये यापुढे दोन्ही युनिटकडे गाळपास येणा-या ऊसाचे ऊस बील पेमेंट १० दिवसांचा करणेत आला असून त्यानुसार पेमेंट करण्यात येत आहे अशी माहीती आ.शिंदे यांनी दिली.
सन २०२१-२२ गळीत हंगामासाठी युनिट नं.१ व २ कडे सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होणार असून सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांनी संपुर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी केले.
या हंगामातील सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप होणे आवश्यक आहे. त्यासाठी युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब येथे दि.१ एप्रिल ते १५ एप्रिल २०२२ या दरम्यान गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.१०० व दि.१६ एप्रिल पासून पुढे गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.२०० प्रमाणे वाढीव अनुदान देण्यात येणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.