इतर

पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.

टिम: विजयदिप न्यूज.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाउंडेशन, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे माळशिरस तालुक़ा उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस, पंढरपूर तालुका सरचिटणीस व ऋषिकेश सावंत-पाटील मित्र परिवार चे दसुर (ता.माळशिरस) येथील ऋषिकेश सावंत-पाटील यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

ऋषिकेश सावंत-पाटील यांच्या वतीने दि.२१ मार्च रोजी पंढरपुर येथे पहाटे ५ वा. श्री.विठ्ठल पूजा, स.६ वा. श्री.विठ्ठल मूर्तिस नामदेव पायरी येथे पंचअमृत अभिषेक, स.११ वा. मातोश्री वृद्धाश्रम येथे समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत वाढदिवस साजरा तसेच थंड पेयाचे वाटप व सायं.७ वा. वृद्धाश्रमामध्ये महाभोजनचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी गोपाळपुर (ता.पंढरपूर) सरपंच विक्रम आसबे. पोलीस पाटील किरण पवार, राष्ट्रवादी सेवादल तालुक़ाध्यक्ष किरण सावंत, विद्यार्थी उपाध्यक्ष प्रवीण खरात, पोपट पवार, रवी माने, दत्ता गवळी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!