इतर

पोलीस पाटील महेश शिंदे यांचा प्रामाणिक पणा.

सापडलेले ३० हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे केली माघारी.

टिम: विजयदिप न्यूज.

सुरज विठ्ठल कदम (तोंडले, ता.माळशिरस) या शेतकर्‍याची पैसे व कागदपत्रे असणारी पिशवी बोंडले-खळवे रस्त्यावरती पडली असता सदर पिशवी दसुर गावाचे पोलिस पाटील महेश शिंदे यांना सापडली. पिशवीत रोख रक्कम ३० हजार व महत्वाची कागदपत्रे होती. पोलिस पाटील महेश शिंदे यांनी सुरज कदम यांचा शोध घेवून रोख रक्कम व कागदपत्रे प्रामाणिकपणे कदम यांना दिली त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे व प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तोंडले (ता.माळशिरस) येथील शेतकरी सुरज विठ्ठल कदम याने आपल्या ट्रॅक्टर मध्ये रोख रक्कम ३० हजार रुपये, बँकेचे पासबुक व चेक बुक असणारी पिशवी ट्रॅक्टर मध्ये ठेवली व ट्रॅक्टर कामानिमित्त बोंडले-खळवे रोडवरून खळवेकडे चालला असताना सदर पिशवी ट्रॅक्टर मधून रस्त्यावर पडली होती. शनिवार १९ मार्च रोजी दु.४ वाजण्याच्या दरम्यान दसुरचे पोलिस पाटील महेश शिंदे कामानिमित्त वेळापूरला चालले असताना त्यांना रस्त्यावरती एक पिशवी सापडली त्यात रोख रक्कम ३० हजार, बँकेचे पासबुक व चेक बुक आढळून आले. त्या पिशवीत असणार्‍या चेक बुकवरती सूरज विठ्ठल कदम असे नाव लिहलेले होते.

सूरज कदम या नावाची व्यक्ती खळवे गावात कोणी आहे का अशी विचारणा पोलिस पाटील शिंदे यांनी खळवे गावातील बऱ्याच नागरिकांना फोन करून केली व पैसे तसेच अन्य कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात आले असता खळवे गावातील प्रत्येकजण सुरज कदम या नावाची व्यक्ति खळवे गावात नसल्याचे सांगत होता.

त्यानंतर पोलिस पाटील शिंदे यांनी बोंडले गावात संपर्क केला असता बोंडले येथील अविनाश जाधव यांचा शिंदे यांना फोन आला व सदर सूरज कदम हा व्यक्ती कामानिमित्ता खळवेकडे जात असताना पैशाची पिशवी पडली आहे असे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच शिंदे यांनी बोंडले येथील डॉ.जयंत चव्हाण यांच्या दवाखान्यात जाऊन सदर रक्कम व कागदपत्रे डॉ.जयंत चव्हाण यांच्या हस्ते खळवे चौकात सुरज कदम यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी अविनाश जाधव, सतीश चव्हाण, आण्णा निंबाळकर, मयूर जाधव, बबलू गायकवाड आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!