इतर

‘दलीत महासंघाच्या’ वतीने श्रीपुर येथे रस्ता रोको.

जांबुड (चंदनशिवे वस्ती) येथील ग्रामिण मार्गाच्या दुरुस्तीची मागणी.

टिम:विजयदिप न्यूज.

जांबूड (ता.माळशिरस) येथील चंदनशिवे वस्ती येथील ग्रामीण मार्ग ४४८ रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी श्रीपूर (ता.माळशिरस) येथे दलित महासंघाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अशोकराव रणवरे व शाखा अभियंता भूमकर यांनी सदरच्या रस्त्याचे दुरूस्ती काम हे कार्यारंभ आदेश होताच १५ दिवसात सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. या लेखी आश्वासनानंतर नागरिकांना वाहतुकीस अडथळा होऊन गैरसोय होऊ नये यासाठी दलित महासंघाचे तालुका प्रमुख प्रदीप नाईकनावरे यांनी सदरचे आंदोलन कांही ठराविक कालावधीसाठी स्थगित केलेचे जाहीर केले.

तसेच सदरच्या रस्त्याचे काम हे १५ दिवसात पूर्ण न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदनही या वेळी उपअभियंता यांना देण्यात आले. 

यावेळ जांबूड (चंदनशिवे वस्ती) वरील बाबासाहेब चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, व भिमराव चंदनशिवे  यांनी आंदोलनात सहभागी झाले होते. तर श्रीरंग चंदनशिवे, सोनू नाईकनवरे, बाबासाहेब नागटिळक, सागर चंदनशिवे हे पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी श्रीपूर औट पोष्टचे एएसआय पानसरे  व पोलीस नाईक गायकवाड यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!