इतर

माळशिरस तालुक्यातील १७ तलावांसाठी ५ कोटी निधी : जानकर

निधी उपलब्ध झाल्यामुळे या भागात पाणी पातळी वाढणार.

टिम: विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुक्यातील १७ तलावाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी आज पत्रकारांना दिली.

माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा निधी उपलब्ध झाल्याचे जानकर म्हणाले.

यावेळी पंचायत समिती सदस्य रणजीतसिंह जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश आबा पालवे, गौतम माने, अजय सकट, शिवराज पुकळे, अमोल मेथा, ज्योतिराम अवताडे आदी उपस्थित होते. 

माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव पाझर तलाव दुरुस्तीसाठी  ३१ लाख ३७ हजार, माणकी  गावठाण येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्तीसाठी १७ लाख ९६ हजार, गारवाड येथील गवाळखोरा  पाझर तलाव दुरुस्ती २१ लाख ९१ हजार, गारवाड भांडे वस्ती पाझर तलाव दुरुस्तीसाठी २३ लाख ५१ हजार, जळभावी अस्वलदरा पाझर तलाव दुरुस्तीसाठी ३१ लाख ९६ हजार, कोथळे माने वस्ती पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४८ लाख ९२ हजार, सुळेवाडी क्र.१ पाझर तलाव दुरुस्तीसाठी ३६ लाख २८ हजार, मळोली क्र.१ पाझर तलाव दुरुस्तीसाठी २४ लाख २९ हजार, मळोली क्र.२ पाझर तलाव दुरुस्तीसाठी ३२ लाख ५० हजार, बचेरी येथील झिरप खोरा पाझर तलाव दुरुस्तीसाठी १७ लाख ८४ हजार, बचेरी येथील कुंभार खोरा पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७ लाख २ हजार, बचेरी येथील माने वस्ती ७ लाख ४२ हजार,  पाझर तलाव दुरुस्ती चांदापुरी आंबेकर वस्ती १७ लाख ६७ हजार, बचेरी क्र.२ दुरुस्तीसाठी ७३ लाख १३ हजार,  रेडे येथील डोंगर शेत पाझर तलाव दुरुस्तीसाठी ५५ लाख १३ हजार रुपये असा निधी मंजूर झाल्याचे जानकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!