इतर

वेळापूर येथे तरुणाच्या गाडीवर गोळीबार.

टिम: विजयदिप न्यूज.

वेळापूर-सांगोला रोडवर दूधगंगा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेसमोर अज्ञात व्यक्‍तीने प्रविण शशिकांत सावंत (वय ३२,रा. कोळेगाव) या युवकावरती गोळीबार केल्याची घटना घडली असून गोळीबार करुन अज्ञात व्यक्‍ती फरार झाली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण शशिकांत सावंत हा आपल्या (एमएच १० बीजी १००२) चारचाकी गाडीतून वेळापुरहून कोळेगावला जात असताना सांगोला रोडवरील दूध डेअरी जवळ वडापाव घेण्यासाठी थांबला असता सायंकाळी ७ च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्‍तीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र प्रविण सावंत हा यातून बचावला.

या गोळीबारत कोणतीही जीवित हानी झाली नाही, सदर घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शिवपुजे यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली व मार्गदर्शक सूचनाही केल्या यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!